पाऊस ओसरणार की कोसळणार? जाणून घ्या मुंबईसह महाराष्ट्रात कुठे कोणता अलर्ट

व्हीडिओ कॅप्शन, मान्सूनचा अजूनही 'या' जिल्ह्यांना धोका? हवामान खात्याचा कोणता अलर्ट?
पाऊस ओसरणार की कोसळणार? जाणून घ्या मुंबईसह महाराष्ट्रात कुठे कोणता अलर्ट
Published

महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडला. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, नाशिक, पणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं.

राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडला. मराठवाडा वगळता इतर ठिकाणी चांगला पाऊस झाला. पण आता पाऊस ओसरताना दिसत आहे. पुढचे काही दिवस कुठे कुठे पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे? नेमकी काय स्थिती असणार आहे? पाहुयात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)