BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'मेधा कुलकर्णींना फुले पगडी घालण्यात आली, हाच विरोधाभास'; फुलेवाड्यातील वटपौर्णिमा वादात का सापडलीये?
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात खासदार मेधा कुलकर्णी यांनी वटपौर्णिमा साजरी करण्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय.
'मीच त्याला विचारलं, बाळा तू गे आहेस का?', LGBTQIA समुदायातील मुलांना पालकांशी जोडणारी 'स्वीकार'
स्वीकारचा पहिला कार्यक्रम झाला तो 17 फेब्रुवारी 2017 मध्ये एका कार्यशाळेच्या स्वरूपात. ती संस्थेची एका अर्थाने सुरुवात. एलजीबीटीक्युआयए समुदायातील मुलांच्या पालकांसाठीचा हा मदतगट. इथं आपल्या पालकांनी आपल्याला स्वीकारावं यासाठी झगडणाऱ्या मुलांना मदत तर केली जातेच. शिवाय ज्या पालकांना हे समजून घ्यायचं आहे, त्याचा स्वीकार करायला अवघड जात आहे किंवा काही प्रश्न आहेत ते सोडवायला मदत केली जाते.
जुलैमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाचाच अंदाज; हवामान विभागानं काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा जूनमध्ये आधीच्या सरासरीच्या तुलनेत 50%च पाऊस पडला असून जुलैमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाचाच अंदाज असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
'समुद्र हेच आमचं घर'; अनेक महिने जहाजावर राहणाऱ्या खलाशांचं आयुष्य कसं असतं?
सध्या जगभरातील विविध जहाजांवर सुमारे 3 लाख भारतीय खलाशी काम करत आहेत. विशेष म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तेलगू भाषिक राज्यांतील लोकांची संख्या खूप मोठी आहे.
व्हीडिओ, जमीन मोजणीच्या धोरणात बदल; मोजणीचे नवीन दर आणि कालावधी जाणून घ्या, वेळ 3,04
राज्य सरकारनं जमीन मोजणीच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. जमीन मोजणीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील दर आणि मोजणीचा कालावधी नव्यानं निश्चित करण्यात आलाय.
आता मोबाईल नंबर नसला, तरीही व्हॉट्सअॅप वापरता येणार; कसं ते जाणून घ्या
29 जूनपासून मेटाने हे फीचर रोलाऊट केलं आहे, जे टप्प्याटप्प्यानं जगभरात लागू होईल. म्हणजे फक्त एका युझरनेमच्या आधाराचे तुम्ही एकमेकांशी कनेक्ट करू शकाल, असं कंपनीनं म्हटलं आहे.
सचिन अहिर : अरुण गवळीचे भाचे, वरळीचं राजकारण ते शिंदेंच्या शिवसेनेचे विधान परिषद उपसभापती पदाचे उमेदवार
शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज (30 जून) त्यांनी अचानक विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
औरंगजेब, त्याची मुलगी ते तृतीयपंथीयांचा प्रभाव; मुघल दरबारातील बातमीपत्रात काय लिहिलंय?
मुघल साम्राज्यात 16 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून लेखक किंवा लिपिक, एजंट आणि सचिवांच्या फौजा 'अखबारात' संकलित करत असत. अखबारात म्हणजे दरबारातील गुप्त मसलत किंवा कारस्थान, लष्करी मोहिमा, नेमणुका, आर्थिक बाबी आणि गप्पागोष्टी यावरचा संक्षिप्त वृत्त अहवाल किंवा बातमीपत्र.
कोकणात मुसळधार पाऊस, गुहागरमध्ये 169 मिमी; जाणून घ्या राज्यात कुठे किती पाऊस
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये (30 जूनला) मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
LIVE TV
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, तुम्ही फोनशिवाय राहू शकता? डिजिटल डिटॉक्सचा प्रयोग केलेल्या 'या' तरुणीचे अनुभव ऐका, वेळ 9,45
जेव्हा एखादी व्यक्ती ऑनलाइन जगातून बाहेर पडते, तेव्हा काय घडते? काहींसाठी असं करणं सोपं ठरू शकतं.
व्हीडिओ, घारापुरीच्या उत्खननात सापडलेल्या 'या' ताम्रपटांमुळे कोणतं रहस्य उलगडलं? , वेळ 14,23
नोव्हेंबर 2025 ते जून 2026 या काळात मुंबईलगतच्या प्रसिद्ध घारापुरी म्हणजेच एलिफंटा बेटावर भारतीय पुरातत्व विभागानं एक अत्यंत महत्वाचं उत्खनन केलं.
व्हीडिओ, केतन अग्रवालच्या हत्येनंतर सिया गोयलच्या आई-वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली?, वेळ 3,42
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणातले एकेक तपशील समोर येत आहेत.
व्हीडिओ, वाळू उपसा की विनाश? तळाशीलमध्ये समुद्र का घुसतोय?, वेळ 4,57
या ग्राऊंड रिपोर्टमध्ये- बीबीसी मराठीने तळाशीलला भेट देऊन ग्रामस्थ, मच्छीमार, स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका जाणून घेतली.
व्हीडिओ, 'समज-गैरसमज' कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता विषयावर डॉ. सुहास पळशीकर यांच्या नव्या पिढीसोबत दिलखुलास गप्पा, वेळ 59,28
धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय? तिचा इतिहास, वर्तमान आणि लोकशाहीशी असलेला संबंध यावर डॉ. सुहास पळशीकर यांची तरुणांसोबत दिलखुलास चर्चा.
व्हीडिओ, पापामिया टेकडी आणि भटाळा: 2 लाख वर्षांपूर्वीच्या वारशाचं अस्तित्व धोक्यात का आलंय?, वेळ 6,53
चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा आणि पापामिया टेकडी ही दोन महत्वाची प्रागैतिहासिक स्थळं लाखो वर्षांच्या मानवी इतिहासाच्या खुणा जपून आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.




































































