BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
पावसाची महाराष्ट्रात सुरुवात दणक्यात, पण लगेच जोर ओसरला; पुढच्या 24 तासांचा अंदाज पाहा
मान्सूननं महाराष्ट्रात पुढे सरकल्यावर दणक्यात सुरुवात केली, पण आता पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. राज्यात आज काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली.
पासपोर्ट नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही; मग कोणती कागदपत्रं ठरतात निर्णायक?
पासपोर्ट हा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही तर मग काय आहे? पासपोर्ट कायदा 1967 मधील कलम 5 नुसार, अर्जाची पडताळणी आणि आवश्यक चौकशी केल्यानंतरच पासपोर्ट जारी केला जाऊ शकतो.
रॉडनं बेदम मारहाण, जाड कोंड्याची भाकरी आणि पिटबुल कुत्र्याचा पहारा; 12 वेठबिगारी मजुरांची भयावह कहाणी
मजुरांनी सांगितलं की, त्यांना कैद्यांसारखं ठेवलं जात होतं. त्यांचे मोबाइल काढून घेतले होते, ओळखपत्रं जाळण्यात आली होती आणि त्यांना बाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली होती.
व्हेनेझुएला भूकंपानं हादरलं; पाहा विध्वंसानंतरचे 10 फोटो
'युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे'च्या (USGS) मते, मृतांची संख्या 10 हजारच्या वर जाण्याची शक्यता 44 टक्के आहे.
नसरापूर प्रकरणातील आरोपीवरील दोष सिद्ध; सुनावणीत कोर्टानं काय म्हटलं?
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज (25 जून) न्यायालयाने निकाल सुनावताना आरोपी हा दोषी आढळला असल्याचे म्हटले आहे.
'या' ठिकाणी पडला मुसळधार पाऊस; राज्यात पावसाची कशी आहे स्थिती?
पावसामुळे काही ठिकाणी उत्साहाचे वातावरण आहे तर काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागल्याचे चित्र आहे.
माहिती अधिकार कायद्यात कोणते नवीन नियम? आरटीआय कार्यकर्त्यांचे काय आहेत आक्षेप?
राज्यात माहिती अधिकार कायद्यात (RTI) काही नियम बदलण्यात आले आहेत. हे नवीन नियम म्हणजे आरटीआय कायद्यावर बंदी आणणं, कायदा बोथट करण्यासारखा प्रकार आहे असा आरोप होतो आहे.
व्हेनेझुएलामध्ये लागोपाठ झालेल्या तीव्र भूकंपांमुळे 32 जण ठार, 700 जण जखमी
व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे काही सेकंदाच्या अंतराने एकापाठोपाठ भूकंपाचे दोन तीव्र झटके आले. पहिला झटका 7.2 रिश्टर स्केलचा होता तर दुसरा 7.5 तीव्रतेचा होता.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावरील जमीन व्यवहाराशी संबंधित आरोपांवरून भाजप-काँग्रेस आमनेसामने
विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं या प्रकरणात मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'समज-गैरसमज' कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता विषयावर डॉ. सुहास पळशीकर यांच्या नव्या पिढीसोबत दिलखुलास गप्पा, वेळ 59,28
धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय? तिचा इतिहास, वर्तमान आणि लोकशाहीशी असलेला संबंध यावर डॉ. सुहास पळशीकर यांची तरुणांसोबत दिलखुलास चर्चा.
व्हीडिओ, 'विरोधातल्यांना निधी मिळत नाही', यावर राजाभाऊ वाजे काय म्हणाले? - विशेष मुलाखत, वेळ 7,33
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडली आणि 9 पैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.
व्हीडिओ, पापामिया टेकडी आणि भटाळा: 2 लाख वर्षांपूर्वीच्या वारशाचं अस्तित्व धोक्यात का आलंय?, वेळ 6,53
चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा आणि पापामिया टेकडी ही दोन महत्वाची प्रागैतिहासिक स्थळं लाखो वर्षांच्या मानवी इतिहासाच्या खुणा जपून आहे.
व्हीडिओ, Video : 'राजीनामा किंवा मला अटक'; कॉक्रोच जनता पार्टीचे दिपके यांचं आंदोलनाबाबत हे आहे मत , वेळ 8,14
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापन अभिजीत दिपके यांनी 20 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला सुरुवात केली आहे.
व्हीडिओ, महाराष्ट्रात मान्सून 23 जूनपर्यंत आगेकूच करण्याची शक्यता, उष्णतेसाठी इथे ऑरेंज अलर्ट, वेळ 3,03
मुंबई आणि आसपासच्या परिसरात आज 21 जूनच्या सकाळी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या
व्हीडिओ, 'लीनिंग टॉवर ऑफ पिसा' तिरका असूनही पडत का नाही?, वेळ 3,32
जगभरात अशा अनेक वास्तू आहेत, ज्या एका बाजूला कललेल्या आहेत. म्हणजे इटलीमधला पिसाचा मनोरा तर आहेच. पण सोबत नेदरलँडमधली डान्सिंग हाऊसेस आणि चीनमधला टायगर हिल पॅगोडाही असाच तिरका आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.



































































