You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समज-गैरसमज : आरक्षणासंबंधी तरुणांचे प्रश्न आणि शंकांवर डॉ. सुखदेव थोरात यांची उत्तरं
समज-गैरसमजच्या दुसऱ्या भागात आरक्षणाविषयी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात तरुणांशी सविस्तर संवाद साधत आहेत.
भारतातील आरक्षणाची गरज काय आहे? त्यामागील घटनात्मक आणि सामाजिक आधार काय आहेत? आरक्षणाचा उद्देश आर्थिक मदत आहे की सामाजिक भेदभावाला उत्तर देणं? अशा अनेक प्रश्नांची उकल या चर्चेत करण्यात आली.
डॉ. थोरात आरक्षणाचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, सामाजिक न्यायाची संकल्पना आणि आजच्या काळातील आरक्षणावरील वाद याविषयी सांगतात.
तसेच आयआयटीसारख्या उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभाव, कट-ऑफ गुण, क्रिमी लेयर, उपवर्गीकरण, प्रतिनिधित्व आणि गुणवत्तेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवरही ते सविस्तर भाष्य करतात.
आरक्षणाविषयी तरुणांच्या मनात असलेल्या प्रश्नांना आणि प्रचलित समज-गैरसमजांना समजून तथ्यांच्या आधारे उत्तरं देण्याचा हा प्रयत्न आहे.
लोकेशन - जी. आर. शॉ सभागृह, IMA, नागपूर
फिल्ड आणि रिसर्च - भाग्यश्री राऊत
शूटिंग - शरद बढे, शाहीद शेख, मनोज आगलावे
एडिटिंग - शरद बढे
प्रोड्यूसर - प्राजक्ता धुळप
संपादक - अभिजीत कांबळे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)