मुजफ्फराबाद, मुरिदके ते बहावलपूर: भारताच्या हल्ल्यानंतर आज पाकिस्तानात काय परिस्थिती?
मुजफ्फराबाद, मुरिदके ते बहावलपूर: भारताच्या हल्ल्यानंतर आज पाकिस्तानात काय परिस्थिती?
गेल्या वर्षी 7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तानातील मुजफ्फराबाद, मुरीदके आणि बहावलपूर इथल्या काही ठिकाणांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांना आता एक वर्षं पूर्ण झालं आहे.
पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा बळी गेलेल्या हल्ल्यानंतर भारताने ही कारवाई केली होती.
भारताचा दावा होता की ही ठिकाणं जमात उद दावा आणि जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ होते, मात्र पाकिस्तानने हे दावे फेटाळले.
सध्या या उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी पाकिस्तानकडून पुनर्बांधणीचं काम सुरू असून बहावलपूरमध्ये कडेकोट बंदोबस्त आणि वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत.
या सर्व घडामोडींनंतरही भारत आणि पाकिस्तानचे संबंध अजूनही डळमळीत आहेत.
पाहा पाकिस्तानातून फरहत जावेद आणि उमर दराझ नांगियाना यांचा रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



